सागरेश्वर अभयारण्य कुंपणाच्या कामाचा आराखडा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:37 AM2020-12-30T04:37:38+5:302020-12-30T04:37:38+5:30

म्हणून व ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी १५ फूट उंचीच्या कुंपणाचा नवीन आराखडा शासनाकडे सादर करा, सात फूट उंचीच्या कुंपणाच्या दुरुस्तीचे ...

Plan the work of Sagareshwar Sanctuary fence | सागरेश्वर अभयारण्य कुंपणाच्या कामाचा आराखडा करा

सागरेश्वर अभयारण्य कुंपणाच्या कामाचा आराखडा करा

Next

म्हणून व ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी १५ फूट उंचीच्या कुंपणाचा नवीन आराखडा शासनाकडे सादर करा, सात फूट उंचीच्या कुंपणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने तातडीने सुरू करा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना दिले आहेत.

कदम यांनी सागरेश्वर अभयारण्यातील विविध प्रश्नांवर विभागीय वनअधिकारी माळी यांच्याशी चर्चा केली. यावेळी सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम व जितेश कदम उपस्थित होते. विश्वजित कदम म्हणाले, बिबट्याच्या वावर लगतच्या गावांमध्ये असल्याचीही चर्चा आहे. सतर्क राहून काम करावे, ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या. तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या कार्यकालात २०१३ येथे मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. आता येथील अपूर्ण असलेली व गरजेची असलेली सर्व कामे हाती घेण्याच्या दृष्टीने तत्परतेने काम करा.

माळी म्हणाले, सागरेश्‍वर अभयारण्याचा विस्तार सुमारे एक हजार सत्त्याऐंशी हेक्‍टर क्षेत्रात आहे. स्थानिक वन विभागाला अभयारण्यात असलेला बिबट्याला थेट पिंजरा लावून पकडण्याचे अधिकार नाहीत.

निसर्ग सफारी बससाठी निधी

सागरेश्वर अभयारण्य परिसरात दुचाकी किंवा पायी जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी आहे. मात्र आता जिल्हा नियोजनमधून येथे निसर्ग सफारी बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर केला जाईल, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.

Web Title: Plan the work of Sagareshwar Sanctuary fence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.