मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 02:20 PM2021-04-14T14:20:47+5:302021-04-14T14:34:58+5:30

survey Manoli Kolhapur Sangli :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या  पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

Possibility of extinction of land survey site at Manoli | मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

मानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता

ठळक मुद्देमानोली येथील जमीन मोजणीचे वारसास्थळ नामशेष होण्याची शक्यता मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा

विकास शहा

शिराळा :  आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू  असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षांनी हा भाग नामशेष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याची वेळीच दाखल घेणे आवश्यक आहे. हे ठिकाण पुणे विभागातील महसूल खात्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

आंबा या गावापासून विशाळगडाच्या रस्त्यावर तीन कि.मी. अंतरावरील मानोली गाव पर्यटन स्थळ पश्चिम महाराष्ट्राचे मानबिंदू ठरावे असे आहे . ब्रिटिशांनी १० एप्रिल १८०२ रोजी भारताच्या त्रिकोनमितीय सर्वेक्षणाला सुरुवात केली. सन १८०० मध्ये झालेल्या म्हैसुर विजयानंतर ब्रिटिशांचा लेफ्टनंट विलियम लॅम्बटन यांनी भारतातील भू - भागाचे अचूक सर्व्हेक्षण करण्याची आवश्यकता ब्रिटिश प्रशासनाकडे कळवली.

ब्रिटिशांनी आरंभलेल्या त्रिकोतमितीय सर्वेक्षणात दोन ठिकाणांना जोडणाऱ्या एका आधाररेषेवरुन ( बेस लाईन ) तिसऱ्या ठिकाणाकडे होणारे कोन मोजले जात आणि त्यांची स्थाननिश्चिती केली जात असे. या प्रकल्पाच्या सुरुवातीची आधाररेषा मद्रास जवळील सेंट थामस माऊंट आणि पेरुमबक्कम यातील १२ किमी लांबीची रेषा होती. दुसरी आधाररेषा बैंगलोर येथे १८०४ मध्ये लेफ्टनंट वारन यांनी निर्धारित केली. १८०६ कोईमतूर , १८०८ तजांवर , १८० ९ तिनवेल्ली , १८२२ हैद्राबाद येथपर्यंत ही रेषा पुढे वाढविण्यात आली. दुसरीकडून दक्षिण- पश्चिम बाजूने अँड्यू स्काऊट वा यांनी १८६१ पर्यंत गोव्यापासून ते कराचीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण केले.

या सर्वेक्षणास ' द गेट दीयोमेट्रीक सर्वे ऑफ इंडिया ' असे नाव दिले. ब्रिटिशांनी आपली वसाहतवादी धोरणे राबवण्यासाठी हे सर्वेक्षण केले असले तरी, संपूर्ण भारताचे मानचित्र , देशाची समृध्दता अचूकतेने शास्त्रीय पद्धतीने अधोरेखित झाले हेच या सर्व्हेक्षणाचे ऐतिहासिक महत्त्व आहे .

१८४२ मध्ये जेव्हा स्कार कोकणातून सर्वेक्षण करत आंबा घाट पार करून आला . तेव्हा, त्रिमितबिंदू निश्चित होईना. उदगिरी , विशाळगड , कासार्डे अशा अनेक ठिकाणी चाचपणी करून अखेर , स्थानिकांच्या मदतीने मानोली येथे हा बिंदू निर्धारित केला गेला. मानोली येथील त्रिमितबिंदूमुळे , कोल्हापूर , सांगली , सातारा , पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची स्थाननिश्चिती झाली. पुढे याच आधारावर कराचीपर्यंत जमीन मोजणी करण्यात आली .

सन १८४२ साली ख्रिसमस साजरा करुन स्कॉट याने डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मानोली येथून नव्या कामाची सुरुवात केली . या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महसूल विभागाच्या वतीने या वारसास्थळावर पांढरा ध्वज फडकवला जातो. मानोली येथील त्रिमितबिंदू हे वारसास्थळ आहे. येथील डोंगराच्या कड्याना मोठ्या भेगा पडल्या आहेत तर काही भाग खचत चालला आहे, त्यामुळे भूमापनाच्या प्रारंभाचे स्मरण करताना या वारसास्थळाचे संवर्धन करुन नव्या पिढीला याचे महत्त्व समजावण्याचा संकल्प करणे आवश्यक वाटते.

Web Title: Possibility of extinction of land survey site at Manoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.