फोटो ३० शीतल ०१
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सत्ता आघाडीची, गृहमंत्री आघाडीचा मग राज्यात महिला असुरक्षित का? असा सवाल करीत औरंगाबादमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षाचा जाहीर निषेध करीत भाजपा युवा मोर्चाच्यावतीने बुधवारी सांगलीतील स्टेशन चौकात निदर्शने करण्यात आली.
युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की राज्याच्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा. आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने महिलेवर अत्याचार केला आहे. या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली.
यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. उपाध्यक्ष नगरसेवक निरंजन आवटी, संघटन सरचिटणीस दीपक माने, किरण भोसले, सरचिटणीस आदित्य पटवर्धन, प्रथमेश वैद्य, ज्योती कांबळे, चेतन माडगूळकर, इम्रान शेख, सुजित राऊत, संदीप तुपे, कृष्णा राठोड, अमित गडदे, अमित देसाई, राहुल माने, अमित भोसले, राजू माने, अक्षय पाटील, शांतीनाथ कर्वे, उदय भडेकर, सचिन ओमासे, अभिजीत सूर्यवंशी, सागर शिंदे, मिरज युवा अध्यक्ष उमेश हारगे उपस्थित होते.