ओळी : कुसाईवाडी (ता. शिराळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवडीनंतर प्राजक्ता शिंदे यांचा सरपंच विनोद पन्हाळकर यांनी सत्कार केला. यावेळी ग्रामसेवक एस. ए. पाटील, भास्कर पवार उपस्थित हाेते.
बिळाशी : कुसाईवाडी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या प्राजक्ता प्रतापराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीचे उपसरपंच भास्कर पवार यांनी अडीच वर्षे कार्यभार सांभाळल्यानंतर राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी प्राजक्ता प्रतापराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. ए. पाटील यांनी काम पाहिले. सरपंच विनोद पन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव भुरके, भास्कर पवार, बाजीराव खोत, छाया यादव, कोमल पन्हाळकर, लक्ष्मी खोत, पोलीस पाटील भगवान येडगे, माजी उपसरपंच रामचंद्र मुदगे, संतोष मुदगे, सुनील पन्हाळकर, मच्छिंद्र पवार, भालचंद्र पवार, अविनाश पवार, विजय खोत, सुरेश पवार, सचिन यादव, प्रदीप मुदगे, आनंदा लुगडे, तानाजी मुदगे, रोहित मुदगे, सुभाष शिंदे, उद्धव शिंदे, जगदीश भुरके, शामराव वारंग, शुभम बेबले, तानाजी पवार, संतोष परिट, अशोक भुरके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्राजक्ता शिंदे यांचे भाजपाचे युवा नेते सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, विकास नांगरे, कोकरुडचे उपसरपंच पोपट पाटील आदींनी अभिनंदन केले.