उमदी परिसरामध्ये पावसाने बेदाणा उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 07:20 PM2020-03-03T19:20:02+5:302020-03-03T19:20:59+5:30
जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या सरी कोसळल्या. या पावसाने तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चांगलीच झोप उडवली आहे.
उमदी : जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे व उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पडलेल्या तुरळक पावसाच्या सरींमुळे थोडा दिलासा मिळाला. सोन्याळ, उटगी, उमदी, सुसलाद, सोनलगीसह परिसरात या सरी कोसळल्या. या पावसाने तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची चांगलीच झोप उडवली आहे.
सध्या जत पूर्व भागात उटगी, उमदीसह परिसरात ३०० हेक्टरहून जास्त द्राक्षबाग लागवड क्षेत्र आहे. यापैकी ८० टक्के बागांचा माल उतरविण्यात आला असून, तो बेदाण्यासाठी शेडवर पाठवला आहे. या पावसाने हा माल काळा पडणे व कुजण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर २० टक्के बागा उतरविणे बाकी आहे. यांना देखील द्राक्षघड गळून पडणे, मणी फुटून कुजण्याच्या प्रक्रियेची दाट शक्यता आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका या बागायतदारांना बसणार आहे.
जत पूर्व भागात द्राक्ष बागयतदार शेतकरी मात्र पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ंद्राक्षबागेतून द्राक्षे उतरून बेदाणा करण्यासाठी शेडमध्ये टाकली आहेत; पण पाऊस पडल्यानंतर बेदाण्याचे जादा नुकसान होऊ नये म्हणून उमदी परिसरातील शेतकरी ताडपत्रीने पूर्ण शेड झाकण्यासाठी धावपळ करतानाचे चित्र दिसत होते.