प्राचार्य कुलकर्णी यांना ‘शिक्षण सेवाव्रती’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:34+5:302021-02-20T05:14:34+5:30

सांगली : मराठी अध्यापक संघाच्या वतीने शिक्षण सेवाव्रती व गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गरवारे कन्या महाविद्यालयाचे ...

Principal Kulkarni receives 'Shikshan Sevavrati' award | प्राचार्य कुलकर्णी यांना ‘शिक्षण सेवाव्रती’ पुरस्कार

प्राचार्य कुलकर्णी यांना ‘शिक्षण सेवाव्रती’ पुरस्कार

Next

सांगली : मराठी अध्यापक संघाच्या वतीने शिक्षण सेवाव्रती व गुणवंत मराठी अध्यापक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी यांना शिक्षण सेवाव्रती पुरस्कार जाहीर झाला. गुणवंत अध्यापक पुरस्कारासाठी सांगलीतील गोसलिया विद्यालयाचे दिलीप पवार आणि देशिंग येथील महालक्ष्मी हायस्कूलच्या शिक्षिका सुरेखा कांबळे यांची निवड झाली. डॉ. श्रीपाद जोशी, कवी सुभाष कवडे, शाहीर पाटील व ह. रा. जोशी यांच्या निवड समितीने पुरस्कारांची घोषणा केली. २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी तथा मराठी राजभाषा गौरवदिनी पुरस्कार वितरण होईल. गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता सोहळा आहे. कवी प्रदीप पाटील, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, आदी उपस्थित राहणार आहेत. अध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी ही माहिती दिली.

Web Title: Principal Kulkarni receives 'Shikshan Sevavrati' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.