सांगलीत पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी रक्तदान शिबिर पार पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष तसेच गुलाबराव पाटील संकुलाचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली आणि मिरजेत घेतलेल्या रक्तदान शिबिरात ११८ जणांनी सहभाग घेतला.
सर्वत्र रक्ताचा तुटवडा असल्यामुळे पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला युवक व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. सांगलीत काँग्रेस भवनजवळ झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे. के. बापू जाधव (दुधोंडी) यांच्याहस्ते आणि पक्षाचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या उपस्थितीत झाले. मिरजेतील रक्तदान शिबिराचे उद्घाटन गुलाबराव पाटील संकुलामध्ये प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांच्याहस्ते झाले. यावेळी समन्वयक डॉ. जिनेश्वर यलीगौडा, डॉ. राजीव जोशी, डॉ. प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
मान्यवरांकडून शुभेच्छा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, माणिकराव ठाकरे आदी मान्यवरांनी दूरध्वनीवरून पृथ्वीराज पाटील यांना शुभेच्छा दिल्या.