जत : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध जत भाजपतर्फे करण्यात आला. याबाबतचे निवेदन जतचे तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले.
सोलापूर येथील घोंगडी बैठकीच्या आयोजनार्थ जात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी आमदार पडळकर यांच्या ताफ्यातील ते स्वतः बसलेल्या गाडीच्या काचेवरती मोठा दगड मारून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोरोना महामारीच्या १४४ कलमांचे पालन करून, सामाजिक अंतर ठेवून निषेध केला. हल्ला केलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. निवेदन देताना भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, ॲड. एन. डी. गडदे, भाऊसो दुधाळ, बाळासो पांढरे, अनिल पाटील, संजय पाटील उपस्थित होते.
010721\img20210701132338.jpg
जतमध्ये हल्ल्याचा निषेध