आर. आर. यांच्याकडे केवळ एक जीप

By admin | Published: September 29, 2014 12:23 AM2014-09-29T00:23:27+5:302014-09-29T00:23:27+5:30

सांपत्तिक स्थिती : अजितराव घोरपडे, सुरेश शेंडगे, खाडे कोट्यधीश

R. R. Only a jeep with them | आर. आर. यांच्याकडे केवळ एक जीप

आर. आर. यांच्याकडे केवळ एक जीप

Next

तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आर. आर. पाटील यांची ७१ लाख ९४ हजार ९६१ रुपयांची गुंतवणूक, ४९ लाख २३ हजार ७२३ रुपयांची स्थावर, तर ४ लाख ६२ हजार ८९८ रुपयांचे कर्ज आहे, तर त्याचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांची गुंतवणूक १ कोटी २८ लाख ४९ हजार, ५ कोटी ९० लाखांची स्थावर, तर ३४ लाख ३ हजाराचे कर्ज आहे. आर. आर. पाटील यांनी बी. ए. नंतर एल.एल.बी पूर्ण केले आहे, तर घोरपडे यांनी बीएमसीसी, पुणेतून बी. कॉम.ची पदवी घेतली आहे.
उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या व त्यांच्या नावावर असणाऱ्या सर्व व्यक्तींची सांपत्तिक स्थिती जाहीर केली आहे. यातील आकडेवारी ही एकत्रित आहे. आर. आर. यांच्या नावावर रोख ५ लाख रुपये आहेत. २३ लाख ६२ हजाराच्या ठेवी, ४० हजाराची एक जीप त्यांच्या नावावर असून, ४ लाख ६२ हजार रुपयांचे स्टेट बँकेचे कर्ज आहे.
अजितराव घोरपडे यांच्या नावे ४९ हजार, २ लाख ६९ हजार रुपयांच्या ठेवी, १ कोटी ७५ लाखाची स्थावर मालमत्ता, पत्नी जयमाला घोरपडे यांच्या नावे २ कोटी ३२ लाखांची स्थावर, तर आई लक्ष्मीबाई घोरपडे यांच्या नावे १ कोटी ८३ लाखांची स्थावर आहे. अनुक्रमे तिघांच्या नावे १४ लाख ८३ जार, ९ लाख ५६ हजार व ९ लाखांचे कर्ज आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुरेश शेंडगे यांचे शिक्षण ११ वी पर्यंत झाले आहे. त्यांच्या नावावरील एकूण ८४ लाख ५ हजार ९९९ रुपयांच्या ठेवी, गुंतवणूक, तर ८ कोटी ३८ लाख ८५ हजार ९९९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यात त्यांची ५ कोटी ८३ लाख, पत्नी सुवर्णा शेंडगे यांची १ कोटी ६२ लाख ४ हजार, मुलगा विजयसिंह यांच्या नावे ८0 लाख ७0 हजार, राजच्या नावे ६ लाख २५ हजार व मुलगी ६ लाख ४३ हजारांची स्थावर आहे. (वार्ताहर)

Web Title: R. R. Only a jeep with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.