मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माने, सुशांत पाटील यांच्या हस्ते व माजी सैनिक माणिक पाटील, ब्रम्हा पाटील, रणजित पाटील, सिध्दार्थ संकपाळ, बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थित झाले.
पाच किलोमीटर धावणे स्पर्धेत सुमंत राजभर, प्रशांत किरुळकर (धामोड), प्रेम पाटील (सागाव), प्रतिक हिरवे (कोडोली), उत्तम बरगावकर (कोडोली); तर १,६०० मीटर धावणे स्पर्धेत ऋषिकेश माळकर (धामोड), अनिकेत पाटील (वारणानगर), शुभम नाकील (सागाव), सुमंत राजभर (सांगली), उत्तम बरगावकर (कोडोली) यांनी यश संपादन केले. स्पर्धा परीक्षेत ७५ जणांनी भाग घेतला. यात अनिकेत प्रभावळकर (बांबवडे), अभिषेक नरुटे (सातवे), अमित जाधव (पुनवत), गणेश आटकेकर (इस्लामपूर), विनायक गायकवाड (चिखली) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळविले.
सरपंच तात्या पाटील, शिवाजी माने, सिध्दार्थ संकपाळ, माणिक पाटील, अक्षय गायकवाड, नीलेश संकपाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
फोटो-११ सागाव १
फोटो : सागाव (ता. शिराळा) येथील मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन विद्या पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सिध्दार्थ संकपाळ, शिवाजी माने, बाबासो पाटील, माणिक पाटील, ब्रम्हा पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो-११ सागाव २
फोटो : सागाव (ता. शिराळा) येथील मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण सरपंच तात्या पाटील, शिवाजी माने, सिध्दार्थ संकपाळ, माणिक पाटील, अक्षय गायकवाड यांच्या हस्ते झाले.