करंजवडे येथील दत्तप्रकाश दिनकर पाटील व इतर शेतकऱ्यांच्या गट नंबर ६१३ मध्ये २५ एकर क्षेत्र असलेल्या खातेदारांच्या सुमारे पाच विहिरी, पोटखराब गायब आहेत, तर गट नंबर ६३३ मध्ये देवकीदेवी दिनकर पाटील यांचे हस्तलिखितमध्ये १७२ गुंठे क्षेत्र सात-बाऱ्यावर नोंद असताना ऑनलाईनमध्ये १०५ गुंठे दाखवते. यात चक्क ६७ गुंठे क्षेत्र गायब झाले आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात २९ सप्टेंबर २०१९ रोजी दुरुस्तीबाबत अर्ज केला आहे. पण तो प्रस्ताव गहाळ झाला असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. क्षेत्राबरोबर प्रस्तावही गायब होत असल्याने आता शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
चाैकट
प्रांताधिकारी न्याय देणार का?
सात-बारा ऑनलाईन करताना अनेक खातेदारांवर अन्याय झाला आहे. तलाठ्यांच्या येण्याच्या वेळा निश्चित नाहीत. दिवसभर त्याची वाट पाहावी लागते. वेळेत उतारे दाखले मिळत नाहीत. तरी या खातेदारांना प्रांताधिकाऱ्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी संजय गांधी निराधार योजनेचे तालुका सदस्य दिनकर पाटील यांनी केली आहे.