पेट शॉप, डॉग ब्रिडिंग सेंटरची नोंदणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:28+5:302021-06-16T04:36:28+5:30
सांगली : पाळीव प्राणी दुकान नियम आणि श्वान प्रजनन व विपणन नियमानुसार पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर चालक ...
सांगली : पाळीव प्राणी दुकान नियम आणि श्वान प्रजनन व विपणन नियमानुसार पेट शॉप व डॉग ब्रिडिंग सेंटर चालक यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले.
या दुकानदारांना नोंदणी आवश्यक असून त्यांनी नोंदणी शिवाय व्यवसाय करु नये. राज्य प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी शिवाय दुकान चालू ठेवल्यास कारवाई होणार आहे त्यामुळे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
एड्सबाधितांना शासनाच्या योजनांचा लाभ द्या
सांगली : जिल्ह्यातील एड्स बाधित रूग्ण व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांना विविध योजनेतून मिळणारे लाभ तातडीने द्यावेत. महिला व बाल विकास विभागाच्या ३७५ लाभार्थ्यांना तातडीने निधी वितरित करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निर्देश दिले.
-----
इस्लामपूरच्या एआरटी सेंटरला निधी मंजूर
सांगली : इस्लामपूर येथील एआरटी सेंटरच्या नूतनीकरणासाठी ९ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून एआरटी सेंटरची आवश्यक कामे तातडीने करून घ्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. इस्लामपूर येथील या सेंटरच्या नूतनीकरणासाठी इतर सुविधा वाढविण्यासाठी निधीची प्रतीक्षा होती आता यातून अपूर्ण कामे पूर्ण करता येणार आहेत.
----
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील राजवाडा चौक परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयाजवळून १२ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी राजेंद्र हणमंत कोळी (रा. तुंग ता.मिरज) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवार दि. १२ रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
----
विश्रामबागमधील ‘फ्री लेफ्ट’वर मातीचा ढिगारा
सांगली : विश्रामबाग येथील पोलीस मु्ख्यालयाजवळ उड्डाणपुलाकडे वळण्यासाठी करण्यात आलेला ‘फ्री लेफ्ट’ मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद आहे. याठिकाणी सुरु असलेल्या एका कामावेळी खोदाई करुन काळी माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. आता प्रमुख चौकातील संपूर्ण डावी बाजू या मातीच्या ढिगाऱ्याखाली असल्याने सांगलीहून येत पुलाकडे वळणाऱ्या वाहनधारकांची अडचण होत आहे.