महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:31 AM2021-09-07T04:31:41+5:302021-09-07T04:31:41+5:30

ओळी :- महापालिकेतील विविध घोटाळ्यांबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांची वि. द. बर्वे, सतीश साखळकर यांनी भेट घेऊन चर्चा ...

Report the scam to the Lokayukta | महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा

महापालिकेतील घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करा

Next

ओळी :- महापालिकेतील विविध घोटाळ्यांबाबत माजी खासदार किरीट सोमय्या यांची वि. द. बर्वे, सतीश साखळकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिकेच्या विशेष लेखापरीक्षणातून कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला आहे. याशिवाय वीज बिल, घनकचरा, एलईडी, झोपडपट्टी पुनर्वसनसह अनेक घोटाळे झाले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे, नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे तक्रार केली. या घोटाळ्याची लोकायुक्त व नगरविकास विभागाकडे नव्याने तक्रारी करा, त्याचा आपण निश्चित पाठपुरावा करू, अशी ग्वाही सोमय्या यांनी दिली.

सोमय्या हे सोमवारी सांगलीत आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात बर्वे व साखळकर यांनी भेट घेऊन महापालिकेतील विविध घोटाळ्याची माहिती दिली. महापालिकेच्या वीज बिलात साडेपाच कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. १९९८ ते २०१५ पर्यंतच्या विशेष लेखापरीक्षणातही अनेक घोटाळे उघडकीस आले आहेत. वसंतदादा बँकेत ६० कोटींची ठेव अडकली आहे. माळबंगला जमीन खरेदी, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, ई-गव्हर्नन्स, घनकचरा प्रकल्प, बोगस सर्वे रिपोर्ट्स, औषध खरेदी, जपानी बँक कर्ज प्रकरण, ठेकेदारांचे जीएसटी प्रकरण, समुद्रा कंपनीला दिलेला एलईडीचा विनानिविदा ठेका, बीओटी आणि ड्रेनेज योजना आदी बाबीत घोटाळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयातही धाव घेतली. शासनाकडेही तक्रारी केल्या; पण त्याची फारशी दखल घेतली नसल्याचे बर्वे व साखळकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावर सोमय्या यांनी महापालिकेतील घोटाळ्याची मालिका पाहता, हा प्रकार गंभीर आहे. याबाबत लोकायुक्त, नगरविकास विभागाकडे पुन्हा नव्याने तक्रार दाखल करा, आपण सर्वजण मिळून हे विषय तडीस घेऊन जाऊ, अशी ग्वाही दिली.

Web Title: Report the scam to the Lokayukta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.