पदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 03:56 PM2021-05-20T15:56:44+5:302021-05-20T15:59:40+5:30

reservation Sangli : राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवड्याची मुदत घेऊन वेळकाढूपणा केला आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे याप्रश्नी संभाव्य आंदोलने शमविण्यासाठी केवळ स्थगितीच्या चर्चेची धूळफेक केली जात आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.

Reservation issues in promotions are just dusting | पदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेक

पदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेक

Next
ठळक मुद्देपदोन्नतीमधील आरक्षणप्रश्नी केवळ धूळफेकसंघटनेमार्फत लढा सुरु राहणार : अमोल वेटम

सांगली : राज्य सरकारने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत एक आठवड्याची मुदत घेऊन वेळकाढूपणा केला आहे. महाविकास आघाडी सरकारतर्फे याप्रश्नी संभाव्य आंदोलने शमविण्यासाठी केवळ स्थगितीच्या चर्चेची धूळफेक केली जात आहे, अशी टीका रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे महासचिव अमोल वेटम यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या ७७ व्या घटना दुरुस्तीनुसार कलम १६ (४ अ) प्रमाणे मागासवर्गीय विशेषत: अनुसूचित जाती जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबतची तरतूद आहे, हे राज्य सरकारने विसरता काम नये. दि. २० एप्रिल रोजी जीआर काढून ३३ टक्के मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण बाजूला ठेवून उर्वरित जागा भरण्याबाबत आदेश काढणे व पुन्हा ७ मे रोजी मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करणे हे संविधान व आरक्षणविरोधी धोरण महाआघाडी सरकारचे आहे.

मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांचा मनमानी कारभार सुरु आहे. मुळातच अजित पवार यांची भूमिका आरक्षण विरोधी व जातीवादी आहे. त्यामुळे त्यांना या पदावरून तत्काळ हटवावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे केलेली आहे, असे वेटम यांनी म्हटले आहे.

सरकारने मागासवर्गीय पदोन्नतीच्या अंमलबजावणीबाबत नवीन कायदा करावा, प्रधान सचिव यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन व्हावी, मागासवर्गीय पदोन्नती उपसमितीचे अध्यक्ष अजित पवार यांना तत्काळ हटवावे, तसेच २०१८ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी दिलेल्या निर्णयाची अमलबजावणी व्हावी अशा मागण्या संघटनेने राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत.

Web Title: Reservation issues in promotions are just dusting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.