शिक्षक बदल्यापूर्वी पदोन्नतीचा प्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:03+5:302021-05-05T04:42:03+5:30
सांगली : जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी पदोन्नतीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी प्राथमिक ...
सांगली : जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या बदल्या करण्यापूर्वी पदोन्नतीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्याकडे केली आहे.
सूर्यवंशी म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून प्राथमिक शिक्षक पदोन्नतीपासून वंचित आहेत. अनेक शिक्षक सेवानिवृत्तही झाले आहेत. काही शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या करण्यापूर्वी शिक्षकांची पदोन्नती झाली पाहिजे. पदोन्नतीने उपशिक्षकांच्या जागा रिक्त होणार असून, बदल्यावेळी या रिक्त जागांचा अनेक बदलीपात्र शिक्षकांना उपयोग होणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक प्रभारी पदावर अतिरिक्त कारभार घेऊन काम करीत आहेत. पदोन्नती दिल्याशिवाय बदल्या करू नयेत.
यावेळी शिक्षक संघाचे सरचिटणीस सुनील गुरव, कार्याध्यक्ष सुरेश पवार, राजू राजे, विकास शिंदे, वसंत सावंत, सुरेश शिंगाडे, दयासागर बन्रे, अशोक परीट आदी उपस्थित होते.
चौकट
शिक्षकांना उन्हाळी सुटी जाहीर कराउन्हाळी सुटी जाहीर करून तसे लेखी पत्र काढावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुटी जाहीर केल्यामुळे इतर जिल्ह्यांतील नवीन शिक्षण सेवक व इतर शिक्षकांना स्वत:च्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाइन पास काढण्यासाठी मदत होईल, असेही सूर्यवंशी यांनी सांगितले.