लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव : ताकारी (ता. वाळवा) चूल व मूल ही संकल्पना दूर करीत महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ही बाब अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन ‘महानंदा’चे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केले.
ताकारी (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत व जागृती विकास संस्थेच्या वतीने आयाेजित पाककला खाद्यपदार्थ निर्मिती प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बाेलत हाेते. सरपंच अर्जुन पाटील अध्यक्षस्थानी होते.
शिबिरात दुग्धजन्य पदार्थांपासून उपपदार्थ निर्मिती, बेकरी पदार्थ व फास्ट फूडचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. याला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सरपंच अर्जुन पाटील म्हणाले, महिला कुटुंबाचा आधार बनाव्यात, या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन केले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्या रूपाली सपाटे, उपसरपंच रवींद्र पाटील, विशाल पाटील, दिलीप साळुंखे, प्रतिभा जाधव, प्रमिला पाटील उपस्थित होत्या.
210921\img_20210921_203343.jpg
ताकारी येथील महीलांच्या खाद्यपदार्थ प्रशिक्षणातील प्रशिक्षीत महीलांना सन्मानीत करताना विनायकराव पाटील अर्जून पाटील रूपाली सपाटे मान्यवर