कडेगाव : कडेगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यातील बहुतांशी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिला या संपात सहभागी झाल्या आहेत. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सर्व व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे राबविले जात आहे. परंतु, त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. याउलट आशा, गटप्रवर्तक यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देत आहेत. आशा सेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात हा संप सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा आशा वर्कर्स संघटनेच्या नेत्या कॉ. मंगल ठोंबरे यांनी दिला आहे.