मांगलेत ऑनलाइन पालक बैठकीस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:28+5:302021-04-14T04:25:28+5:30
मांगले : मांगले (ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची ऑनलाइन ...
मांगले : मांगले (ता.शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची ऑनलाइन बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी नाईक यांनी मार्गदर्शन केले.
या ऑनलाइन बैठकीस शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू दळवी, केंद्रप्रमुख तानाजी माने, पांडुरंग गायकवाड, सरपंच मीनाताई बेंद्रे, उपसरपंच धनाजी नरुटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी सोनार, संजय पाटील, उत्तम ल्हायकर, विश्वास वरेकर शाळेतील सर्व शिक्षक व पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाबद्दल माहिती दिली. विस्ताराधिकारी विष्णू दळवी, केंद्रप्रमुख तानाजी माने यांनी पालकांना मार्गदर्शन केले. बैठकीत मीनाक्षी सोनार, भाग्यश्री रांजणे या पालकांनी व भास्कर खोत, दगडू पाटील, राजाक्का पाटील, रेश्मा कुंभार, पुष्पलता खबाले या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक पहिलीच्या वर्गशिक्षिका वैशाली कुरणे यांनी केले. भाऊसाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक महादेव साळुंखे यांनी आभार मानले.