डिसेंबर महिन्यात मालमत्ता खरेदीतून मिळाला १५ कोटी रुपयांचा महसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:48+5:302021-01-01T04:18:48+5:30

सांगली : बीड मुद्रांक शुल्कात शासनाने जाहीर केलेल्या ५० टक्के सवलतीचा चांगलाच फायदा नागरीकांनी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या ...

Revenue of Rs 15 crore from property purchase in December | डिसेंबर महिन्यात मालमत्ता खरेदीतून मिळाला १५ कोटी रुपयांचा महसुल

डिसेंबर महिन्यात मालमत्ता खरेदीतून मिळाला १५ कोटी रुपयांचा महसुल

Next

सांगली : बीड मुद्रांक शुल्कात शासनाने जाहीर केलेल्या ५० टक्के सवलतीचा चांगलाच फायदा नागरीकांनी उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. एकट्या डिसेंबरमध्येच सुमारे कोटींची मुद्रांक विक्री होण्याची अपेक्षा आहे. किंबहुना मुद्रांक शुल्क विभागाने यंदाचे महसुलाचे वार्षिक टार्गेट नोव्हेंबर महिन्यातच ओलांडले आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन काळात झालेली ही उलाढाल विस्मयजनक वाटावी अशीच आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडण्यास निर्बंध असतानाही फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. यंदा एप्रिलमध्ये दस्त नोंदणी बंद राहिल्याने एकही व्यवहार होऊ शकला नाही. त्यानंतर मात्र गती मिळाली. ऑगस्ट ते नोव्हेंबर या प्रत्येक महिन्यात चार हजारांहून अधिक खरेदी-विक्री व्यवहार झाले. ऑक्टोबरमध्ये तर ४ हजार ९६५ झाले.

३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास एप्रिलपर्यंत व्यवहार करण्याची सूट शासनाने दिली आहे, त्याशिवाय शुल्कात ग्रामिण भागातील व्यवहारासाठी अवघे २ टक्के तर शहरी भागासाठी ३ टक्के शुल्क भरण्यास मुभा दिली. थेट पन्नास टक्के सवलतीमुळेही डिसेंबरमध्ये प्रचंड व्यवहार झाले. काहीजणांनी मुद्रांक शुल्क भरुन व्यवहारांचे आरक्षण करुन ठेवले, त्यांना मार्चअखेरपर्यंत कधीही दस्त नोंदविता येईल असे साहेबराव दुतोंडे म्हणाले.

नोव्हेंबरपर्यंत सांगलीकरांनी १५५ कोटी भरले

n एकट्या नोव्हेंबर महिन्यातच ४ हजार ८९४ व्यवहार झाले. त्याद्वारे १२ कोटी ९९ लाखांचा महसुल शासनाला मिळाला.

n जानेवारीमध्ये १८ कोटी १९ लाख तर फेब्रुवारीमध्ये १८ कोटी ५५ लाखांचा महसुल सांगलीकरांनी शासनाकडे जमा केला.

n एप्रिलमध्ये दस्त नोंदणी बंद राहिल्याने एकही खरेदी-विक्रीचा व्यवहार होऊ शकला नाही. नंतर मात्र गती आली. मे महिन्यात ९६४ व्यवहारांतून कोटी ४५ लाख रुपये मिळाले. जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये १५५.१५ कोटी रुपये मिळाले.

n सर्वाधिक ४ हजार ९६५ व्यवहार ऑक्टोबरमध्ये झाले. साडेतेरा कोटी मिळाले.

नोव्हेंबरमध्येच १०२ कोटींवर महसुल जमा

मार्चपासून आर्थिक वर्षात १०० कोटींच्या महसुलाचे उद्दीष्ठ्य होते, ते नोव्हेंबरमध्येच १०२ कोटींवर गेले. मार्चअखेरपर्यंत दिडशे कोटी होण्याची शक्यता आहे. शासनाने ५० टक्के सवलत दिल्याचा लाभ नागरीकांनी घेतला. ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शु्ल्क भरल्यास एप्रिल अखेरपर्यंत व्यवहार करता येतील.

- साहेबराव दुतोंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी

कोरोनामुळे गर्दीवर प्रतिबंध

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दस्त नोंदणी काऱ्यालयांमध्ये नियमांचे काटेकोर पालन झाले. गर्दी टाळण्यासाठी पक्षकारांना संभाव्य वेळा देण्यात आल्या. मास्कशिवाय नोंदणीसाठी प्रवेश दिला नाही. निबंधकांपुढे प्रत्येक दस्त नोंदणीसाठी मोजक्या आणि आवश्यक तितक्याच पक्षकारांना प्रवेश दिला गेला. यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.

Web Title: Revenue of Rs 15 crore from property purchase in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.