हरिपूर : मतदान जागृतीसाठी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या ‘रन फॉर व्होट’ विधानसभा २०१४ मिनी मॅरेथॉन स्पर्धेत आज अवघी सांगली धावली. दोन हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून स्पर्धेस प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याहस्ते निशाण दाखवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी खेळाडूंना स्पर्धेचा मार्ग सांगून सूचना दिल्या. सुरेश पाटील व डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मनपा आयुक्त अजिज कारचे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, विजय पवार, मौसमी बर्डे, कोल्हापूरचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, मुंबईचे क्रीडाधिकारी सुहास व्हनमाने, उमेश बडवे, शंकर भास्करे, सुरेश मोटे, दीपक सावंत, शाम जाधव उपस्थित होते. पंच म्हणून राजेंद्र कदम, महेश पाटील, जितेंद्र पाटील, बापू समलेवाले, जनार्दन झेंडे, दीपक राऊत, मुन्ना आलासे, सचिन हरोले यांनी काम पाहिले. राजाराम खांडे व विजय सोनावळे यांच्या खणखणीत हलगीवादनाने स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अंतिम निकाल असा : ३५ ते ६० वर्षे : पुरूष : दत्ता कदम, दत्तात्रय जाधव, महेश कंबोगी. महिला : वंदना नाईक, रूक्साना मुलाणी, गौरांगी तेली. १४ ते ३५ वर्षे : मुले : भरत भागोरा, अमोल साळुंखे, रिलेश मुंगळे. मुली : प्रियांका जाधव, प्रियांका पवार, कोमल निकम. (वार्ताहर)टी-शर्टसाठी गोंधळटी-शर्ट वाटपात प्रचंड गोंधळ झाला. स्पर्धक व संयोजकांमध्ये बाचाबाची झाली. भरदुपारी दीड-दोन तास उन्हात उभे राहूनही टी-शर्ट न मिळाल्याने काही संतप्त स्पर्धक संयोजकांच्या अंगावर गेले. एका प्रशिक्षकाला चोप देण्याचाही प्रयत्न झाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करताच संतप्त जमावाची पांगापांग झाली.
रन फॉर व्होटसाठी धावली सांगली
By admin | Published: October 12, 2014 11:13 PM