Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 02:52 PM2019-10-21T14:52:21+5:302019-10-21T14:55:38+5:30

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

In Sangli district, polling till 5 o'clock is 5.98 per cent | Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान

Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदानसांगलीवाडी व गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद

सांगली : सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.

सकाळी ११ वाजेपर्यंत जत विधानसभेसाठी १६.८०, शिराळा मतदार संघात १५.५२, इस्लामपूर मतदारसंघात २२.६८, पलूस-कडेगाव मतदारसंघात २३.५८, खानापूर-आटपाडी मतदारसंघात १५.६१, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात १६.६९, मिरज विधानसभा क्षेत्रात १३.६८, तर सांगली विधानसभा क्षेत्रात १५.९९ टक्के मतदान झाले.

सांगली मतदार संघात सांगलीवाडी व गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याने अर्धा तास नागरिकांना मतदानासाठी ताटकळत थांबावे लागले. वाळवा मतदारसंघातील साखराळे व तासगाव-कवठेमहांळमधील आरवडे येथे, तसेच शिराळा तालुक्यातही काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले.

Web Title: In Sangli district, polling till 5 o'clock is 5.98 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.