सांगली : सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.सकाळी ११ वाजेपर्यंत जत विधानसभेसाठी १६.८०, शिराळा मतदार संघात १५.५२, इस्लामपूर मतदारसंघात २२.६८, पलूस-कडेगाव मतदारसंघात २३.५८, खानापूर-आटपाडी मतदारसंघात १५.६१, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात १६.६९, मिरज विधानसभा क्षेत्रात १३.६८, तर सांगली विधानसभा क्षेत्रात १५.९९ टक्के मतदान झाले.सांगली मतदार संघात सांगलीवाडी व गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याने अर्धा तास नागरिकांना मतदानासाठी ताटकळत थांबावे लागले. वाळवा मतदारसंघातील साखराळे व तासगाव-कवठेमहांळमधील आरवडे येथे, तसेच शिराळा तालुक्यातही काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले.
Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 2:52 PM
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले.
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदानसांगलीवाडी व गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद