सांगलीत थरार : नोकरीसाठी इटकरेच्या तरुणाची टॉवरवर पुन्हा ‘वीरूगिरी’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:29 PM2018-09-11T13:29:05+5:302018-09-11T13:39:49+5:30

सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) या तरुणाने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली.

Sangli fever: 'Virugiri' again on ITC's youth tower for job! | सांगलीत थरार : नोकरीसाठी इटकरेच्या तरुणाची टॉवरवर पुन्हा ‘वीरूगिरी’ !

सांगलीत थरार : नोकरीसाठी इटकरेच्या तरुणाची टॉवरवर पुन्हा ‘वीरूगिरी’ !

Next
ठळक मुद्देसांगलीत थरार : नोकरीसाठी इटकरेचा तरुण पुन्हा टॉवरवर !पंधवड्यात दुसऱ्यांदा कृत्य; सुटकेसाठी यंत्रणेची धडपड

सांगली : सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) या तरुणाने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी देत पुन्हा ‘वीरूगिरी’ केली.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता हा प्रकार घडला. पंधरा दिवसापूर्वीही तो याच टॉवरवर चढला होता. त्याच्या सुटकेसाठी पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाने धडपडक केली. तासभराच्या थरारानंतर त्याला सुरक्षित खाली घेण्यात यश आले.



अनिल गेल्या पाच वर्षांपासून सैन्य दलात नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे. पण त्याला प्रत्येक भरतीत अपयशच पदरात पडले. तो कला शाखेचा पदवीधर आहे. पदवी असूनही कुठे नोकरी मिळत नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून नाराज होता. यातून मंगळवारी त्याने थेट सांगली गाठली.

सकाळी दहा वाजता त्याने सर्वांची नजर चुकवून टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. तब्बल सहाशे फूट उंचीच्या टॉवरवर जाऊन तो उभा राहिला. पण कोणाचीही त्याच्यावर नजर गेली नाही. सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने टॉवरचे स्पेअरपार्ट व नटबोल्ट व लोखंडी अँगल खाली टाकले. तरीही कोणाचे लक्ष गेले नाही. अकरा वाजता हा प्रकार उघडकीस आला.


अग्निशमन दलाचे पथक तातडीने दाखल झाले. तो सहाशे फुटावर होता. अनेकांना तो दिसतही नव्हता. शहर पोलिसही घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

अग्निशमन व पोलिसांनी त्याच्याशी मोबाईलवरच संपर्क साधून खाली उतरण्याची विनंती केली; पण त्याने मला नोकरीचे पत्र मिळाल्याशिवाय खाली उतरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्याची समजूत काढताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. शेवटी पोलीस व अग्निशमनचे अधिकारी टॉवरवर चढले. समजूत काढून त्याला सुरक्षितपणे खाली घेतले. तासभर हा थरार सुरु होता.


नुसते आश्वासनच

कुंभार हा २७ आॅगस्ट २०१८ रोजी याच टॉवरवर चढला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी व पोलिसांनी त्याला नोकरी लावतो, असे आश्वासन दिले होते. तसेच त्याच्याविरुद्ध आत्महत्येची धमकी दिल्याचा गुन्हाही दाखल केला नव्हता. पण प्रत्यक्षात नोकरीबाबत गेल्या पंधरा दिवसात काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मंगळवारी सकाळी पुन्हा या टॉवरवर चढला.

Web Title: Sangli fever: 'Virugiri' again on ITC's youth tower for job!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.