सांगलीचे किमान तापमान २४ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:25 AM2021-04-19T04:25:00+5:302021-04-19T04:25:00+5:30
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान २४ अंशावर गेले. किमान ...
सांगली : जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. रविवारी जिल्ह्याचे किमान तापमान २४ अंशावर गेले. किमान तापमानाची सध्या विक्रमी वाटचाल सुरू आहे. यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात कमाल व किमान तापमानात चढ-उतार अनुभवास आले. दुसऱ्या पंधरवड्याच्या सुरुवातीलाच तापमानात वाढ होत आहे. रविवारी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसाप्रमाणे रात्रीचा उकाडाही असह्य होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार आहे. दोन दिवसांत कमाल तापमान ४० च्या घरात जाणार असून २१ एप्रिलपासून पारा ४१ अंशापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे दिवसाचा उकाडाही नागरिकांना अधिक त्रासदायी होणार आहे.
आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. कमाल तापमानात वाढ होणार असली तरी किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.