सांगलीत पेट्रोल १०५ रुपयांकडे, डिझेल ९५ रुपये प्रतिलिटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:54+5:302021-06-27T04:17:54+5:30
सांगली : सांगलीत पेट्रोलच्या किमती शनिवारी १०४.०१ रुपयांवर पोहोचल्या, तर डिझेल ९४.५२ रुपये दराने विकले जात होते. इंधनाची दरवाढ ...
सांगली : सांगलीत पेट्रोलच्या किमती शनिवारी १०४.०१ रुपयांवर पोहोचल्या, तर डिझेल ९४.५२ रुपये दराने विकले जात होते. इंधनाची दरवाढ थांबण्याचे नाव घेत नसून ग्राहक हैराण झाले आहेत.
तेल कंपन्या एक दिवसाआड पेड्रोल व डिझेलची दरवाढ करीत आहेत. अवघ्या महिन्याभरात पेट्रोलने १०० रुपयांवरून १०४ रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सांगलीत शनिवारी पहाटेपासून नव्या, वाढीव दराने विक्री सुरू झाली. ग्रामीण भागात १०४-५० पैसे असा दर राहिला. स्पीड पेट्रोल १०६.८७ रुपयांवर पोहोचले आहे. काही पंपांवर ते १०७ रुपयांना विकले जात आहे.
डिझेलनेदेखील दरवाढीच्या शर्यतीत पेट्रोलचा पाठलाग सुरू केला आहे. सांगलीत शनिवारी डिझेल ९४.५२ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. ग्रामीण भागात ९५ रुपयांपर्यंत भाववाढ पाहायला मिळाली. दरवाढ अशीच वेगाने सुरू राहिली तर डिझेल महिन्याअखेरीस ९८ रुपयांवर पोहोचण्याची भीती आहे.