Sangli vidhan sabha assembly election result 2024: सांगली जिल्ह्यात महायुतीची मुसंडी; जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील यांचे मताधिक्य किती.. वाचा

By हणमंत पाटील | Published: November 23, 2024 11:48 AM2024-11-23T11:48:25+5:302024-11-23T11:49:25+5:30

महायुतीला पाच आणि महाविकास आघाडीला तीन जागावर मताधिक्य

Sangli vidhan sabha assembly election result 2024 the Mahayuti is leading In Sangli district What is the vote margin of Jayant Patil, Vishwajit Kadam, Rohit Patil | Sangli vidhan sabha assembly election result 2024: सांगली जिल्ह्यात महायुतीची मुसंडी; जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील यांचे मताधिक्य किती.. वाचा

Sangli vidhan sabha assembly election result 2024: सांगली जिल्ह्यात महायुतीची मुसंडी; जयंत पाटील, विश्वजित कदम, रोहित पाटील यांचे मताधिक्य किती.. वाचा

हणमंत पाटील

सांगली : जिल्ह्यातील आठपैकी पाच विधानसभेच्या जागांवर आघाडी घेत महायुतीने मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे गतपंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडील शिराळा आणि काँग्रेसच्या जतच्या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुती पाच आणि महाविकास आघाडी तीन असे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, जत व शिराळा या पाच जागा होत्या. तर महायुतीकडे सांगली, मिरज व खानापूरची अशा तीन जागा होत्या. या निवडणुकीत जिल्हयात बरोबर उलटे चित्र निर्माण झाले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Results 2024

महायुतीकडे पूर्वीच्या सांगली, मिरज व खानापूर यासह नव्याने जत व शिराळा या दोन जागांची भर पडली. त्यामुळे महायुतीला पाच जागांवर आघाडी मिळाली. तर इस्लामपूर, पलूस-कडेगाव व तासगाव-कवठेमहांकाळ या तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आठव्या फेरी अखेर मताधिक्य आहे.

सांगली जिल्ह्यातील विधानसभा पक्षनिहाय आघाडीवरील उमेदवार

  • सांगली : सुधीर गाडगीळ (भाजप)
  • मिरज : सुरेश खाडे (भाजप)
  • शिराळा : सत्यजित देशमुख (भाजप)
  • जत : गोपीचंद पडळकर (भाजप)
  • खानापूर: सुहास बाबर (शिंदेसेना)
  • तासगाव कवठेमहांकाळ : रोहित पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)
  • पलूस कडेगाव : विश्वजित कदम (काँग्रेस)
  • इस्लामपूर: जयंत पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष)


सांगली जिल्ह्यातील सर्व 8 विधानसभा मतदारसंघ सध्याची मताची आकडेवारी

शिराळा - शिराळा मधून नव्या फेरी अखेर भाजपचे सत्यजित देशमुख 9 हजार 219 मतांनी आघाडीवर 

तासगाव कवठेमंकाळ - तासगाव कवठेमहांकाळमधून नव्या फेरी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील 6 हजार 769 मतांनी आघाडीवर 

सांगली  - सांगली मधून दहाव्या फेरी अखेर भाजपचे सुधीर गाडगीळ 25 हजार मतांनी आघाडीवर

खानापूर - खानापूर मधून नव्या फेरी अखेर शिंदे यांच्या शिवसेनेचे सुहास बाबर 40 हजार मतांनी आघाडीवर 

इस्लामपूर - इस्लामपूर मधून अकरावी फेरी अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील 11 हजार 500 मतांनी आघाडीवर

जत - जत मधून सहाव्या फेरी अखेर भाजपचे गोपीचंद पडळकर 6 हजार 850 मतांनी आघाडीवर 

पलूस कडेगाव - पलूस कडेगाव मध्ये आठव्या फेरी अखेर काँग्रेसचे विश्वजीत कदम 3 हजार 60 मतांनी आघाडीवर 

मिरज - मिरजेतून सातव्या फेरी अखेर भाजपचे सुरेश खाडे 27 हजार 296 मतांनी आघाडीवर

Web Title: Sangli vidhan sabha assembly election result 2024 the Mahayuti is leading In Sangli district What is the vote margin of Jayant Patil, Vishwajit Kadam, Rohit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.