सांगली जिल्हा परिषदेत कोरोना कक्षातील डॉक्टरांसह पाच कर्मचारी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:53 PM2020-07-25T14:53:13+5:302020-07-25T14:56:46+5:30
सांगली : जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह तर डॉक्टरासह पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह ...
सांगली : जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह तर डॉक्टरासह पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणूनच जिल्हा परिषद प्रशासने दि. २७ ते २९ जुलै मुख्यालयाचे काम बंद ठेवले असून कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करावे, अशी सूचना अधिकाय्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षात कोरोना शिरल्याने नियंत्रण कक्षातील ५४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण कक्ष प्रमुख तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुपाल गिरीगोसावी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह ५४ जणांचे घेतले होते.
शनिवारी सकाळी आलेल्या अहवालात डॉ. संजय साळुंखे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. विवेक पाटील यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ४३ कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
कोरोना नियंत्रण कक्षामध्ये कोरोना शिरल्याने जिल्हा परिषद मध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि कोरोना नियंत्रण कक्ष सॅनिटायझर करण्यात आला होता. तसेच जिल्हा परिषद मुख्यालयाचे कामकाज दि. २७ ते २९ जुलै बंद ठेवले आहे.
कर्मचाऱ्यांनी घरातून आपल्या विभाग प्रमुखाच्या संपर्कात राहून काम करावे, अशी सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.