सांगली : ‘तिरंगा आमची शान आहे, भारतीय राज्यघटना जनतेचा सन्मान आहे’, ‘संविधान हमारा जानसे प्यारा, यही है भारत का नारा’, अशा लक्षवेधी घोषणांचे फलक घेऊन सहभागी झालेले तरुण आणि भारतीय संविधानाचे स्थान अधिक प्रबळ करणाऱ्या घोषणा देणाऱ्या नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सांगलीत सोमवारी संविधान सन्मान मोर्चा निघाला. जिल्हाभरातून आलेले संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भारतीय संविधान देशाचा प्राण असताना, ते जाळून अपमान करणाऱ्यांवर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने करण्यात आली. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. सोमवारी विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या सर्वात पुढे तरुणांच्या हाती भव्य राष्ट्रध्वज होता. तिरंग्यातील रंगाच्या टोप्या घातलेले नागरिक संविधान सन्मानाच्या घोषणा देत सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे राणी यादव यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. त्यानंतर प्रतीक्षा कोरी, रहिस्मा मुल्ला, आश्लेषा कुरुंदवाडे, माधुरी कचरे आणि कोमल मगदूम या पाच तरुणींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांना निवेदन सादर केले.
यावेळी डॉ. बाबूराव गुरव, कॉ. धनाजी गुरव, डॉ. संजय पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, गौतमीपुत्र कांबळे, अॅड. के. डी. शिंदे, आशिष कोरी, अमर पांडे, अॅड. अमित शिंदे, महेश खराडे, रवींद्र ढाले, सचिन सवाखंडे, ज्योती आदाटे, महेश माने, मुनीर मुल्ला, नितीन कांबळे, सदाशिव मगदूम, सुरेश दुधगावकर यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.पक्षांकडून संविधानाला धोकाराष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही ही सर्वात आधुनिक समाजव्यवस्था आहे. लोकशाहीविरोधी संस्था, संघटना व पक्षांनी संविधान मोडून काढायला सुरूवात केली आहे. दिल्लीमध्ये काही संघटना नियोजनपूर्वक संविधान जाळतात व पोलीस त्याचे छायाचित्रण करतात. वास्तविक तेथे उपस्थित असणाºया पोलिसांनी तेथेच त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. हे सत्ताधाऱ्यांचे लोकशाहीविरोधी भयंकर षड्यंत्र आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मनुस्मृती समर्थकांचा व सनातनी लोकांचा संविधानास विरोध राहिला आहे. आता केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार असल्यामुळे संविधानिक व्यवस्था मोडीत काढली जात आहे. त्यामुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे.नेत्यांचा सहभाग...या मोर्चात विविध सामाजिक संघटनांबरोबरच राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. खा. राजू शेट्टी, आ. सुमनताई पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता.प्रमुख मागण्या...संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करा.संविधानाची प्रत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा.गुन्हा घडताना बघ्याची भूमिका घेणाºया पोलिसांवरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा.शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करा.संविधान दिवस शासकीय स्तरावर साजरा करावा.