सांगलीत वेश्या अड्डा उद्धवस्त, एलसीबीची कारवाई, सहाजणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 03:21 PM2017-11-29T15:21:23+5:302017-11-29T15:29:18+5:30
विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली पुरविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
सांगली : विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली पुरविणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यामध्ये पुजा उर्फ सविता मनोज बोईन (वय ४०, रा. योगीराज बंगला, श्रीरामनगर, विजयनगर), एजंट रिक्षाचालक सुनील यशवंत पुकळे (वय ३०, रा. सुतगिरणी, कुपवाड), उमेश रवी कांबळे (२१, रा. महात्मा फुले सोसायटी सुतगिरणीजवळ कुपवाड), विशाल संजय सावंत (१९, रा. भारत सुतगिरणी चौक), नारायण धोंडीराम कुंभार (३१) व अभिजित रघुनाथ कुंभार (३०, दोघेही रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिस अधिक्षक सुहेर शर्मा, अप्पर अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधसंदर्भात जिल्ह्यात कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक राजन माने यांना दिले होते. एलसीबीकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला विजयनगरमधील योगीराज बंगल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
कक्षाकडील उपनिरीक्षक शिल्पा यमगेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने योगीराज बंगल्यावर छापा टाकला. या छाप्यात मुली पुरविणाऱ्या पुजा बोईन, एजंट सुनील पुकळे याच्यासह चार ग्राहक ताब्यात घेतले. या अड्ड्यावरील एक अल्पवयीन मुलगी व पिडीत महिलेची पोलिसांनी सुटका केली.
या सहाजणाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा व बाल लैगिंक अत्याचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई सहाय्यक पोलिस फौजदार भगवान नाडगे, हवालदार विकास पाटणकर, लता गावडे, कविता पाटील यांनी भाग घेतला.