सांगलीचे पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे जाणार : विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:25 PM2020-01-01T19:25:44+5:302020-01-01T19:27:36+5:30

भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्'ाबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रिपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्'ातील नेत्याकडेच पालकमंत्रिपद असण्याची परंपरा सांगलीत दीर्घकाळ राहिली;

Sangli's guardian minister will go to Jayant Patil | सांगलीचे पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे जाणार : विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत

सांगलीचे पालकमंत्रिपद जयंत पाटील यांच्याकडे जाणार : विश्वजित कदम यांचेही नाव चर्चेत

Next
ठळक मुद्देआठवडाभरात घोषणा शक्य

सांगली : राज्यातील नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जिल्'ाच्या वाट्याला आता दोन मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे पालकमंत्री कोण होणार, याविषयीची चर्चा रंगली आहे. अर्थमंत्रीजयंत पाटील यांच्याकडेच सांगली जिल्'ाचे पालकमंत्रिपद येण्याची दाट शक्यता आहे. राज्यमंत्री विश्वजित कदमही पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत.

भाजपच्या सत्ताकाळात सांगलीचे पालकमंत्रिपद चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुख या जिल्'ाबाहेरील नेत्यांकडे होते. त्यापूर्वी पंधरा वर्षे आघाडी सरकारच्या काळात सांगलीचे पालकमंत्रिपद डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. जिल्'ातील नेत्याकडेच पालकमंत्रिपद असण्याची परंपरा सांगलीत दीर्घकाळ राहिली; मात्र भाजपच्या सत्तकाळात यात खंड पडला. बाहेरील नेत्यांकडे पालकमंत्रिपद दिल्यामुळे जिल्'ास त्यांचा फारसा फायदा होत नसल्याची टीकाही होत होती. कार्यकर्त्यांसह नागरिकांतूनही नाराजी होती. महापुराच्या काळात तत्कालीन पालकमंत्री सुभाष देशमुख जिल्'ात फिरकले नसल्याने त्यांना जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागला होता.

राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. जिल्'ाला जयंत पाटील यांच्या माध्यमातून एकच कॅबिनेट मंत्रिपद लाभले आहे. विश्वजित कदम राज्यमंत्री आहेत. सर्वात ज्येष्ठ नेत्याकडे पालकमंत्रिपद असावे, असा आजवरचा राजकीय संकेत असल्याने आघाडीच्या काळात पतंगराव कदम यांच्याकडे पालकमंत्रिपद होते. त्यावेळी जयंत पाटील व दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनीही जिल्'ाच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रह धरला नव्हता. आता जिल्'ात ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटील यांच्याकडेच पाहिले जाते. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी विश्वजित कदम यांच्यापेक्षा पाटील यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. पाटील यांच्याकडे अन्य जिल्'ाची जबाबदारी सोपविली गेल्यास दुसरा पर्याय म्हणून विश्वजित कदम यांना संधी मिळू शकते. त्यामुळे जिल्'ाच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हाती आहे.
जयंत पाटील यांनी यापूर्वी मुंबईचे पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे त्यांना अन्य कोणत्या मोठ्या जिल्'ाची जबाबदारी मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र जिल्'ात सध्या आघाडीची स्थिती मजबूत असून, ती आणखी मजबूत करण्यासाठी अनुभवी नेता म्हणून पाटील यांना पालकमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा राष्टÑवादीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
कदम समर्थकांना आशा
विश्वजित कदम यांनाही पक्षसंघटनेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणाचा अनुभव असल्याने त्यांना जिल्'ाचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी आशा कदम समर्थकांना वाटत आहे.

 

Web Title: Sangli's guardian minister will go to Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.