बिळूर येथील तीन दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:01+5:302021-04-22T04:27:01+5:30
शेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जतच्या महसूल विभागाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. बिळूर (ता. जत) येथे नियम डावलून ...
शेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जतच्या महसूल विभागाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. बिळूर (ता. जत) येथे नियम डावलून सुरू असलेली तीन दुकाने प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या आदेशानुसार अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, तलाठी बी.बी. शिंदे, ग्रामविकास अधिकारी आनंदा राठोड, कोतवाल अंकुश शिंदे, काशीनाथ बंजत्री यांनी सील केली.
तलाठी बी.बी. शिंदे म्हणाले, बिळूर भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ हाेऊ शकते. त्यामुळे शासनाने यासंबंधी जे नियम दिले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासन सज्ज आहे. अत्यावश्यक सेवावगळता सर्व दुकाने बंद असताना बिळूर येथील कापड दुकान, मोबाइल शाॅपी, भांडी सेंटर सुरू हाेते. ही तीन दुकाने सील करून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.