कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही इतर आजारांवरील शस्त्रक्रियांना नाही वेटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:44+5:302021-09-13T04:24:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पहिल्या लाटेवेळी इतर आजारांवरील शस्त्रक्रियांना आलेले अडथळे योग्य नियोजनामुळे यंदा दुसऱ्या लाटेत दूर झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पहिल्या लाटेवेळी इतर आजारांवरील शस्त्रक्रियांना आलेले अडथळे योग्य नियोजनामुळे यंदा दुसऱ्या लाटेत दूर झाले. मिरज शासकीय रुग्णालयांतील शस्त्रक्रिया थांबल्यानंतर, सांगली सिव्हिलमध्ये अशा रुग्णांवर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे सांगलीच्या रुग्णालयावर गेल्या सहा महिन्यांत ताण वाढला आहे.
कोरोनाच्या लाटेत नॉन कोविड रुग्णांचे हाल होत असतात. पहिल्या लाटेत अत्यंत वाईट अनुभव रुग्णांना आला होता. त्या वेळी सांगलीच्या सिव्हिलमध्येही ५० बेडचे रुग्णालय सुरू केले होते. त्यामुळे पहिल्या लाटेत इतर आजारांवरील शस्त्रक्रियांना अडथळा आला होता. यंदा मात्र तशी स्थिती नाही. सांगली सिव्हिल हॉस्पिटल हे पूर्णत: नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध राहिल्याने शस्त्रक्रियांसाठी वेटिंग करावे लागले नाही.
चौकट
मिरजेत शस्त्रक्रियांसाठी प्रतीक्षा कायम
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत असले, तरी मिरजेतील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू होण्याची अद्याप प्रतीक्षा कायम आहे. सध्या मिरज सिव्हिलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. येथील अधिकारी, कर्मचारी कोविडच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे दुसरी लाट आटोक्यात येईपर्यंत येथील नॉन कोविड विभाग पूर्ववत होणार नाही.
चौकट
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात इमर्जन्सी शस्त्रक्रियांना सध्या कोणताही अडथळा येत नाही.
त्यांना फार वेळ यासाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
चौकट
प्लान शस्त्रक्रिया
रुग्णांचा ताण वाढला असला, तरी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्लान शस्त्रक्रियांचे योग्य पद्धतीने नियोजन केले जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट टोकाला असताना थोड्या अडचणी आल्या, मात्र आता लाट ओसरत असल्याने अडचणी घटल्या आहेत.
कोट
दुसऱ्या लाटेवेळी सांगली सिव्हिल रुग्णालय नॉन कोविड रुग्णांच्या सेवेत कायम आहे. येथे कोणत्याही शस्त्रक्रिया थांबल्या किंवा लांबणीवर गेल्या नाहीत. यापुढेही हे नियोजन कायम राहणार आहे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक
चौकट
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
कोरोनाचे एकूण रुग्ण १,९५,५९४
बरे झालेले रुग्ण १,८८.५२६
एकूण कोरोना बळी ५,१४९
सध्या उपचार सुरु असलेले १,९१९