महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:50 PM2022-12-27T13:50:35+5:302022-12-27T13:51:27+5:30

स्पर्धेत जिल्ह्यातील विक्रमी २२५ खेळाडूंनी सहभाग घेतला

Selection of Sandeep Mote, Subodh Patil from Sangli for Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड

महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीतून संदीप मोटे, सुबोध पाटील यांची निवड

googlenewsNext

खानापूर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून माती विभागात खुल्या गटातून संदीप मोटे (कंठी) याची तर मॅट विभागातून सुबोध पाटील (सांगली) याची निवड झाली.

तालीम संघाची निवड चाचणी स्पर्धा खानापूर येथे पार पडली. माती गटात संदीप मोटे विरुद्ध संदेश ठाकूर (सांगली) यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये मोटे याने ठाकूर यास गुणांवर पराभूत करत तर मॅटमधून सुबोध पाटीलने अभिषेक देवकर (बेणापूर) याच्यावर गुणांवर विजय मिळवला.

खानापूर येथील एका मंगल कार्यालयाच्या पटांगणावर निवड स्पर्धा पार पडली. यावेळी माती विभागात ५७ किलो गटात रोहित तामखडे (भिकवडी), ६१ किलो गटात तेजस पाटील (सुरूल), ६५ किलो गटात अतुल चौगुले (इस्लामपूर), ७० किलो गटात मयूर जाधव (चिंचोली), ७४ किलो गटात श्रीकांत निकम (देविखिंडी), ७९ किलो गटात अंकुश माने (वाळवा), ८६ किलो गटात सचिन माने (शेगांव), ९२ किलो गटात सयाजी जाधव (तडसर), ९७ किलो गटात अभिषेक घारगे (उपाळे मायणी) विजेते ठरले.

मॅट विभागात ५७ किलो गटात निनाद बडरे (आटपाडी), ६१ किलो गटात प्रकाश कोळेकर (आरेवाडी), ६५ किलो गटात सुनील बंडगर (सुरूल), ७० किलो गटात नाथा पवार (बेणापूर), ७४ किलो गटात अतुल नायकल (पेठ), ७९ किलो गटात प्रथमेश गुरव (शिराळे खुर्द), ८६ किलो गटात भारत पवार (शिवाजीनगर), ९२ किलो गटात विश्वजित रूपनर (खंडेराजुरी), ७ किलो गटात सागर तामखडे (भिकवडी) विजेते ठरले.

स्पर्धेत जिल्ह्यातील विक्रमी २२५ खेळाडूंनी सहभाग घेतला. सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. संयोजन सुहास (नाना) शिंदे युवा मंच (खानापूर), महेश जाधव युवा मंच (जाधववाडी), सजन्न बाबर युवा मंच (बानूरगड) यांनी केले.

बक्षीस वाटप सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष नामदेवराव मोहिते यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, रमेश पुजारी, खजिनदार राजाराम पवार, कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील, माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे, प्रा. प्रतापराव शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Web Title: Selection of Sandeep Mote, Subodh Patil from Sangli for Maharashtra Kesari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.