लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी मांगले (ता. शिराळा) येथील रवींद्र कोकाटे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे यांनी दिले.
काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. ते नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात. आतापर्यंत त्यांनी शिराळा विधानसभा युवक काँग्रेसचे चिटणीस व संघटक म्हणून काम केले आहे. त्यांनी शिराळा तालुक्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देत सर्व कमिट्या पूर्ण स्थापित करण्यासाठी तालुकाध्यक्ष ॲड. रवी पाटील यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस सेवा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव आनंद, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुसैन अली भाटी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे, पुणे विभाग अध्यक्ष आशिष पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रदीप टाकरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष ॲड. रवी पाटील यांनी त्यांना ही काम करण्याची संधी दिली.