गोटखिंडीत विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:42+5:302021-05-29T04:20:42+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने अप्पर तहसीलदार दीक्षान्त देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या ...
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने अप्पर तहसीलदार दीक्षान्त देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या सूचनेवरून येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष सुरू केला.
येथील कोरोनाबाधितांची संख्या दीडशेवर जाऊ लागल्याने व रुग्ण, त्यांचे नातलग बाहेर फिरत असल्याने विलगीकरण कक्षाशिवाय पर्याय नाही. यासाठी कोरोनाबाधितांच्या घरी जाऊन विलगीकरण कक्षात राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. सरपंच विजय लोंढे, उपसरपंच विजय पाटील, ग्रामसेवक दिलीप कदम, तलाठी अविनाश नवले, तंटामुक्तीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात यांनी विलगीकरण कक्षाची स्थापना केली.
फोटो : २८०५२०२१-आयएसएलएम-गोटखिंडी विलगीकरण : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील कोरोना रुग्णांच्या घरोघरी जाऊन पाहणी करताना अप्पर तहसीलदार दीक्षान्त देशपांडे, पोलीस निरीक्षक अजित सिद, सरपंच विजय लोंढे, उपसरपंच विजय पाटील.