सांगली : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक शेखर इनामदार यांचा वाढदिवस उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती निरंजन आवटी, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, सुरेश आवटी, धीरज सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, महापालिकेचे गटनेते विनायक सिंहासने, माजी सभापती पांडूरंग कोरे, माजी महापौर गीता सुतार, ॲड. स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, सविता मदने, कल्पना कोळेकर, गजानन मगदूम, दीपक माने, पंचायत समिती सदस्य राहूल सकळे, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, नगरसेवक प्रकाश ढंग, सुब्राव मद्रासी, संजय कुलकर्णी, भालचंद्र पाटील, संजय परमणे, दरिबा बंडगर यांच्यासह अनेकांनी दूरध्वनी व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.