स्वच्छता अभियानात शिरगाव कवठेची आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:25 AM2021-03-05T04:25:55+5:302021-03-05T04:25:55+5:30

कवठे एकंद : तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे गावाने नुकतीच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. बरोबरच ...

Shirgaon Kavathe's advance in sanitation campaign | स्वच्छता अभियानात शिरगाव कवठेची आगेकूच

स्वच्छता अभियानात शिरगाव कवठेची आगेकूच

Next

कवठे एकंद : तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे गावाने नुकतीच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. बरोबरच वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम गेल्या काही वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या जोरावरच शिरगाव कवठेची स्वच्छता अभियानामध्ये आगेकूच सुरू आहे.

शिरगाव कवठे गावाने पाणीपुरवठा, दिवाबत्तीची सोय, रस्ते, निर्मल ग्राम संकल्पना, प्राथमिक शाळांची आकर्षक सुशोभीकरण यासारख्या कामांतून आपली ओळख निर्माण केली आहे. गेल्या चार वर्षांच्या काळात वृक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात काम उभे करून वृक्ष लागवड व संवर्धनाची विशेष कामगिरी गावाने केली आहे. युवक मंडळे, महिला बचत गट, लोकसहभाग, स्थानिक लोकप्रतिनिधींचा पुढाकार, प्रशासनाची भूमिका यातून ग्रामस्वच्छता अभियानाची वाटचाल सुरू आहे.

सरपंच अनिल पाटील, उपसरपंच दीपक कोळी, ग्रामसेवक डी. आर. कुंभार, अमोल माने, आनंदा कोळी, श्रीकांत पाटील, सरिता माने, वनिता चव्हाण, वैशाली पाटील, वैशाली सुतार यांच्यासह ग्रामपंचायतीमार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Shirgaon Kavathe's advance in sanitation campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.