‘रिनेसन्स स्टेट’ पुस्तकावर बंदीची शिवप्रतिष्ठानची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:21 AM2021-05-29T04:21:24+5:302021-05-29T04:21:24+5:30
माडग्याळ : गिरीश कुबेरलिखित ‘रिनेसन्स स्टेट’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जत येथील शिवप्रतिष्ठानने निवेदनाद्वारे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे ...
माडग्याळ : गिरीश कुबेरलिखित ‘रिनेसन्स स्टेट’ या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी जत येथील शिवप्रतिष्ठानने निवेदनाद्वारे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गिरीश कुबेर यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक आक्षेपार्ह लिखाण केले आहे. शिवप्रतिष्ठानमध्ये धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासात त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करीत वंदन करीत असतात. या संदर्भहीन लिखाणामुळे महाराष्ट्रातील सर्व धर्मभक्त कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात जातीजातीमध्ये तेढ निर्माण व्हावे या उद्देशाने हे लिखाण केले असून, त्याचा निषेध करतो. या पुस्तकावर देशभरात बंदी घालावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. निवेदनावर सुनील चव्हाण, संग्राम पवार, सुमित कोडग, सिदगोंड पाटील, अनिल पाटील, अमर जाधव आदींच्या सह्या आहेत.