इस्लामपुरात ‘महसूल’च्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:15 AM2021-02-19T04:15:53+5:302021-02-19T04:15:53+5:30
इस्लामपूर : महसूल विभागाच्या चुकीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी शहर शिवसेनेच्यावतीने नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शंखध्वनी आंदोलन करून तहसीलदारांना ...
इस्लामपूर : महसूल विभागाच्या चुकीच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी शहर शिवसेनेच्यावतीने नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शंखध्वनी आंदोलन करून तहसीलदारांना घेराव घालण्यात आला.
महसूल प्रशासनाचा धिक्कार असो, कामकाजामध्ये आरेरावी करत नागरिकांची अडवणूक करणाऱ्या तलाठ्यांची बदली झालीच पाहिजे, संगणकीय सात-बारा उताऱ्यातील चुका दुरुस्त करून द्या, अशा घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
सय्यद यांनी शिवसैनिकांसमवेत तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या दालनात महसूलच्या कामकाजाबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. उरुण चावडीतील अनागोंदी कारभाराविषयी काय कारवाई केली, अशी विचारणा केली. त्यावर सबनीस यांनी उरुण चावडीची दप्तर तपासणी केली आहे. तलाठ्यांवरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे दिला आहे. येत्या १५ दिवसांत प्रलंबित नोंदी घालण्यात येतील. उरुण चावडीची दोन सजामध्ये विभागणी होणार असल्याचे सांगितले.
यावेळी अॅड. अविनाश पाटील, नगरसेवक प्रदीप लोहार, राजेंद्र पवार, महंमद शेख, अशोक चव्हाण, सूूर्यकांत पाटील, संदीप पवार, गुलाब मुल्ला, योगेश हुबाले, अंकुश माने, ओंकार देशमुख, अनिल नाईक, शहाजी गायकवाड, विशाल पाटील, चंद्रकांत पाटील, शिवकुमार शिंदे, सुधीर पन्हाळकर, दीपक जाधव, रमेश देसाई, सुनील कोकरे उपस्थित होते.
फोटो - १८०२२०२१-आयएसएलएम-शिवसेना आंदोलन
इस्लामपूर येथे तहसील कचेरीसमोर शिवसेनेच्यावतीने महसूल विभागाचा धिक्कार करण्यात आला. यावेळी शकील सय्यद, प्रदीप लोहार, सूर्यकांत पाटील, महंमद शेख उपस्थित होते.