‘महावितरण’कडून दरवाढीचा ‘शॉक’ आणि ‘गुड न्यूज’ही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:27 AM2021-04-22T04:27:03+5:302021-04-22T04:27:03+5:30
सांगली : महावितरण कंपनीने जिल्ह्यातील शून्य ते ३०० युनिटपर्यंतच्या घरगुती वीज ग्राहकांना एक टक्के दर कपात करून गुड न्यूज ...
सांगली : महावितरण कंपनीने जिल्ह्यातील शून्य ते ३०० युनिटपर्यंतच्या घरगुती वीज ग्राहकांना एक टक्के दर कपात करून गुड न्यूज दिली आहे. मात्र, ३०१ ते ५०० युनिटच्या ग्राहकांना एक टक्के तर ५०० युनिटपेक्षा जास्त वापर असणाऱ्या वीजग्राहकांना दोन टक्के दरवाढीचा शॉक दिला आहे. मे महिन्याचे बिल नवीन दरानुसार असेल, असे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.
१ एप्रिलपासून वीजदर सुमारे दोन टक्के कमी करण्याचा निर्णय झाला आहे. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगांसाठी १० टक्के वीजदर कमी केले. त्यानंतर यावर्षी १ एप्रिलपासून संपूर्ण वर्षासाठी दर कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘महावितरण’ने दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. निवासी वापरासाठी एप्रिलपासून १ टक्के तर अनिवासी वापरासाठी २ ते ५ टक्के कपात केली आहे. घरगुती १०० युनिटच्या ग्राहकांना वीज वापरासाठी आता प्रत्येक युनिटमागे ३.४४ रुपये मोजावे लागतील. १०० ते ३०० युनिटच्या ग्राहकांना प्रतियुनिट नऊ पैसे सवलत मिळणार आहे. मात्र, ३०१ ते ५०० युनिट वापर असणाऱ्यांना चार पैसे दरवाढीचा शॉक बसणार आहे. ५०० युनिटपेक्षा जादा वापर असणाऱ्यांना तर प्रति युनिट ११ पैसे जादा मोजावे लागणार आहेत.
चौकट
१ एप्रिलपासून नवीन दर
जुने दर नवीन दर
युनिट वीज आकार वीज आकार
० ते १०० ३ रुपये ४६ पैसे ३ रुपये ४४ पैसे
१०१ ते ३०० ७ रुपये ४३ पैसे ७ रुपये ३४ पैसे
३०१ ते ५०० १० रुपये ३२ पैसे १० रुपये ३६ पैसे
५०१ ते १००० ११ रुपये ७१ पैसे ११ रुपये ८२ पैसे