जिल्ह्यात सहा तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:34 AM2021-06-16T04:34:40+5:302021-06-16T04:34:40+5:30

लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील सहा तालुके आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. जत, कवठेमहांकाळ, पलूस, ...

Six talukas in the district on the path of coronation! | जिल्ह्यात सहा तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर!

जिल्ह्यात सहा तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर!

Next

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : दुसऱ्या लाटेनंतर जिल्ह्यातील सहा तालुके आता कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. जत, कवठेमहांकाळ, पलूस, शिराळा, खानापूर व आटपाडी या तालुक्यांत दररोज आढळणारी रुग्णसंख्या १०० पेक्षा कमी आहे. विशेषत: मिरज तालुक्यांतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या खूपच कमी आहे. रविवारी आटपाडीत ३०, खानापुरात ३०, पलूसमध्ये ८४, तासगावात २०, जतमध्ये ५०, कवठेमहांकाळमध्ये ४२ व शिराळ्यात ८५ रुग्ण नवे सापडले. आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर व शिराळ्यातील स्थिती तुलनेने चांगली आहे.

ग्राफ

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण

मिरज ३९५, जत ३६३, कवठेमहांकाळ २९५, तासगाव २५९, आटपाडी, पलूस २९६, शिराळा ४२७, वाळवा ९६७, खानापूर २१३, कडेगाव ४३०

आतापर्यंत झालेल्या चाचण्या ७,०८,३९६

बाधित होण्याचे प्रमाण ७.७ टक्के

बरे होण्याचे प्रमाण टक्के ९०.२५ टक्के

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट टक्के ९०.२५ टक्के

तालुके कोरोनामुक्तीच्या मार्गावर ६

एकूण रुग्ण १, ३०,२०१

बरे झालेले रुग्ण १,१७,५१२

उपचार सुरु असलेले रुग्ण ८,९५१

मृत ३,७३८

दुसऱ्या लाटेत वाळव्यात रुग्ण वाढले

दुसऱ्या लाटेत वाळवा तालुक्यातील रुग्णसंख्या सतत वाढत आहे. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात सापडत आहेत. विशेष म्हणजे १ लाख ४३ हजार इतके सर्वाधिक लसीकरणदेखील याच तालुक्यात झाले आहे. वाळवा, इस्लामपूर या शहरी भागासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या मोठी आहे. तब्बल ३२ हॉटस्पॉट प्रशासनाने निश्चित केले आहेत.

कोट

काही तालुक्यांत रुग्णसंख्या कमी होत आहे. ती आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाभरातील जास्त रुग्णसंख्येच्या गावांची माहिती संकलित केली आहे. तेथे उपाययोजनांवर भर देत आहोत. कोरोनाचा रिकव्हरी रेटही चांगला आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Six talukas in the district on the path of coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.