सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्हाभरात मुद्रांकांचा प्रचंड काळाबाजार सुरु आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक १२० रुपयांना विकला जात आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊनही काळाबाजार करणार्यांवर कारवाई झालेली नाही.जिल्ह्यात मुद्रांकांची टंचाई नसतानाही काळाबाजार सुरु आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह ग्रामिण भागातील मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची अडवणूक सुरु आहे. प्रत्येक मुद्रांकासाठी २० रुपये जादा वसुल केले जात आहेत, अन्यथा मुद्रांक शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबर महिन्यात शासनाने मालमत्ता खरेदीमध्ये थेट ५० टक्क्यांची सूट जाहीर केली होती. ३१ डिसेंबरपर्यंत चलन भरल्यास मार्चअखेरपर्यंत दस्त करण्याची सूट होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रांकांची मागणी प्रचंड वाढली. त्याचा नेमका फायदा मुद्रांक विक्रेत्यांनी उचलला.मुद्रांक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता टंचाई किंवा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, प्रत्यक्षात विक्रेते मात्र टंचाई असल्याचे सांगत जादा पैशांची वसुली करत होते. मुद्रांकाचे मुल्य वाढेल तशी वसुलीची रक्कमही वाढत होती. सांगलीत राजवाडा परिसरात एकाच विक्रेत्याकडे मुद्रांक उपलब्ध असल्याने ग्राहकांची झुंबड उडत आहे, पण विक्रीसाठी वेगळी सोय प्रशासनाने केलेली नाही.ग्रामपंचायत निवडणुकीमुळेही मागणी वाढलीग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मुद्रांकाची मागणी वाढल्यानेही ताळ्या बाजाराला ऊत आला. उमेदवारांनी वाट्टेल त्या किंमतीला मुद्रांक घेतले, त्याचा फटका सामान्य ग्राहकांनाही बसला. विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करत सर्वसामान्यांनाही लुटले.डिसेंबरमध्ये प्रचंड लूटएकट्या डिसेंबर महिन्यात जिल्हाभरात ५ हजारांहून अधिक खरेदी-विक्री झाले. त्यापोटी २२ कोटींचे मुद्रांक शुल्क पक्षकारांनी भरले. प्रत्येक मुद्रांकामागे २० रुपयांच्या अतिरिक्त वसुलीचा विचार करता यातून विक्रेत्यांनी किती पैसे मिळविले असावेत ही विचार करण्याजोगी स्थिती आहे.