शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

आयर्विनच्या पर्यायी पुलाचे घोंगडे भिजतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 10:29 PM

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पर्यायी पूल उभारणीस सांगलीवाडीतील नागरिक व शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. यामुळे ...

ठळक मुद्दे नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध कायम : पंधरा दिवसात काम सुरू होणार; तोडगा काढण्यात अद्याप अपयश

सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला समांतर पर्यायी पूल उभारणीस सांगलीवाडीतील नागरिक व शहरातील व्यापाऱ्यांचा विरोध कायम आहे. यामुळे ठेकेदाराने काम सुरू करण्याचे धाडस केलेले नाही. त्यात विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हालचालीही थंडावल्या आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात विरोध कमी करण्याचे कोणतेच प्रयत्न न झाल्याने, या पुलाचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे.

दरम्यान, येत्या पंधरा दिवसात पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार आहे. पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदाराला वर्कआॅर्डरही देण्यात आली आहे. मुख्य रस्ता-कापड पेठमार्गे पांजरपोळसमोरून सांगलीवाडीतील चिंचेच्या बनापर्यंत हा पूल आहे. आयर्विन पुलाजवळूनच १० मीटर अंतर सोडून पर्यायी पूल उभारला जाणार आहे. या नव्या पुलावर जाण्यासाठी टिळक चौक व पांजरपोळ या दोन्ही ठिकाणी वाय टाईप रस्ता ठेवला आहे. पुलाची उंची आयर्विनइतकीच असून लांबी २०० मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला २०० मीटरचा रस्ता असेल. हा पूल तीनपदरी करण्यात आला आहे.

मात्र या पर्यायी पुलाला सांगलीवाडीतील नागरिक व हरभट रस्त्यावरील व्यापाºयांनी विरोध केला आहे. व्यापाºयांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनही दिले आहे. सांगलीवाडीतून भाजपचे नेते, माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार विरोधाची तयारी सुरू झाली आहे. मध्यंतरी ठेकेदाराने पुलाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न सांगलीवाडीतील नागरिकांनी हाणून पाडला होता. त्यानंतर पुलाचे काम थांबले. वाढता विरोध पाहून ठेकेदारानेही काम सुरू करण्याचे धाडस केले नाही. त्यानंतर तीन ते चार महिने पुलाबाबत कसलीच वाच्यता झाली नाही. आता ठेकेदाराने यंत्रसामग्री सांगलीत आणली असली तरी, प्रत्यक्षात कामाला हात घातलेला नाही. त्यात सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन संपल्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

कडाडून विरोध : दिनकर पाटीलआयर्विनच्या पर्यायी पुलाला नागरिक व व्यापाऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध अजूनही कायम आहे. आम्ही नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तयार करीत आहोत. लवकरच नव्या सरकारला व पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. नव्या पुलामुळे शहरातून अवजड वाहतूक सुरू होईल. आताच हरभट रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यात अवजड वाहतूक सुरू झाल्यास वाहतुकीचे नियोजनच कोलमडणार आहे. पर्यायी पूल उभा करायचाच असेल, तर तो हरिपूर रस्ता लिंगायत स्मशानभूमीजवळून करावा. त्यामुळे कोल्हापूर, मिरज ते इस्लामपूर या मार्गावरील वाहतूक शहराबाहेरून होईल. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही. त्यातूनही पुलाचे काम सुरू झाल्यास आम्ही कडाडून विरोध करू, असे माजी आमदार दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले.

पाटबंधारे विभागाकडे आराखडा सादर : हरिपूर-कोथळी पुलाला पाटबंधारे विभागाची तांत्रिक मान्यता घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने चालढकल केली. पण आयर्विनच्या पर्यायी पुलाबाबत मात्र बांधकाम विभागाने सावध पवित्रा घेतला आहे. पुलाचा आराखडा तांत्रिक मान्यतेसाठी पाटबंधारे विभागाकडे सादर केला आहे. वास्तविक पर्यायी पुलाचा आराखडा तयार करण्याचे काम दोन वर्षे सुरू होते. पुराचा धोका व इतर बाबींची तपासणी करूनच बांधकाम विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून पर्यायी पुलाला हिरवा कंदील मिळेल, असा विश्वास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आहे.

 

टॅग्स :Sangliसांगलीriverनदी