शशांक कुलकर्णी यांना समाजसेवा रत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:40+5:302021-05-29T04:20:40+5:30
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील युवा लेखक आणि संशोधक शशांक कुलकर्णी यांना दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन ...
इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथील युवा लेखक आणि संशोधक शशांक कुलकर्णी यांना दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा समाजसेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्लोबल ह्युमन राईटस फाऊंडेशन आणि नॅशनल अँटी हरॅशमेंट फौंडेशनच्या वतीने संशोधन क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार दिल्याचे रवी के. एस. नारायण आणि विकास महाजन यांनी सांगितले.
कुलकर्णी यांनी ‘स्वामीनाथन कमिशन : ए फ़ाऊंडेशन ऑफ फार्मर पोलीसीज इन इंडिया’ या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या कृषी आणि शेतकरी धोरणात विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या या पुस्तकाला एम. एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना आहे. कुलकर्णी सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाचे सिनीअर रिसर्च फेलो म्हणून जम्मू-काश्मीरमधील जम्मू केंद्रीय विद्यापीठात चार वर्षांपासून देशाच्या शेती आणि शेतकरी धोरणावर संशोधन करत आहेत. त्यांची मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतील सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
फोटो २८०५२०२१-आयएसएलएम-शशांक कुलकर्णी