ओळ : दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चर्मकार समाज आणि श्रमिक नगर येथे गटर कामास प्रारंभ. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर व संदेश कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : वाळवा येथे चर्मकार समाज दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत चार लाख आणि पाच लाख रुपये खर्चाच्या दोन ठिकाणच्या गटारीच्या कामाचा प्रारंभ बुधवारी करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर व संदेश कांबळे उपस्थित होते.
यावेळी संदेश कांबळे म्हणाले, वाळवा शहरात जिथे जिथे दलित वस्ती, मागासवर्गीय समाज आहे, तिथे तिथे जाऊन तेथील अडीअडचणींचा विचार करून तेथील अंतर्गत रस्ते व गटारींचे काम सुरू केले आहे. ही कामे युवा नेते गौरव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लवकरात लवकर पूर्ण होतील. दलित वस्ती निधी प्रत्येक मागासवर्गीय घटकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.