अंकलीजवळ साडेचार लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:20 AM2021-05-28T04:20:48+5:302021-05-28T04:20:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दारू दुकाने बंद असतानाही दारूची वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या दोघांवर कारवाई ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दारू दुकाने बंद असतानाही दारूची वाहतूक करणाऱ्या करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. यात त्यांच्याकडून ११ लाख ९२ हजार १६० रूपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश सुरेश कांबळे (वय ३३) व राहुल अर्जुन लांडगे (२९, दोघेही रा. कापसे प्लॉट, सुभाषनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व दारू दुकाने बंद आहेत. त्यामुळे अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने अंकलीजवळ छापा टाकून कारवाई केली. त्यात पिकअप वाहन क्रमांक (एमएच ०९ सीयू ३३८४)मधून विदेशी मद्याचे ६० बॉक्स नेले जात होते. पोलिसांनी हे वाहन जप्त केले असून, त्याची किंमत चार लाख ५६ हजार ९६० रूपये आहे. गोवा बनावटीच्या दारूच्या विक्रीला बंदी असतानाही त्याची विक्रीसाठी वाहतूक केली जात होती.
याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने ही कारवाई केली.