खासदार गटाकडून यंग ब्रिगेडला बळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:16 AM2021-02-22T04:16:45+5:302021-02-22T04:16:45+5:30
२)२१ रणजित घाडगे. ३)२१ उदय भोसले अर्जुन कर्पे। कवठेमहांकाळ : नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना भाजपचे पदाधिकारी म्हणून खासदार संजयकाका ...
२)२१ रणजित घाडगे.
३)२१ उदय भोसले
अर्जुन कर्पे।
कवठेमहांकाळ : नव्या दमाच्या युवा कार्यकर्त्यांना भाजपचे पदाधिकारी म्हणून खासदार संजयकाका पाटील यांनी संधी दिली आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार गटाला युवकांचे मोठे बळ मिळणार असून काका गट मजबूत होणार आहे.
काँग्रेसपाठोपाठ भाजपनेही तरुण कार्यकर्त्यांना पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी संधी देण्यास सुरुवात केली आहे. कवठेमहांकाळ शहरात आगामी नगरपंचायत निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते रणजित घाडगे यांना कवठेमहांकाळ शहरात भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद दिले आहे. रणजित घाडगे यांचा शहरातील युवक, नागरिक यांच्याशी चांगला संबंध व संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीने कवठेमहांकाळ शहरात खासदार गटाला एक तरुण, आश्वासक चेहरा मिळाला आहे.
भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी खासदार पाटील यांनी रांजणी येथील उदयराजे भोसले यांना थेट जिल्ह्याची जबाबदारी दिल्याने खासदार गटाला आता तालुक्यातील ग्रामीण भागात युवकांचे जाळे निर्माण करण्यासाठी एक होतकरू तरुण कार्यकर्ता मिळाला आहे. उदयराजे भोसले यांचे तालुक्यात युवक कार्यकर्ते संपर्कात असल्याने त्यांचा फायदा खासदार गटाला होणार आहे.
खासदार पाटील यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना खंबीर पाठबळ व न्याय देण्याची आजवरची त्यांची भूमिका कायम ठेवली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील तरुण वर्ग काकांकडे आकर्षित होत आहे. निष्ठावान युवा कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या त्यांच्या या भूमिकेची चर्चाही चांगलीच रंगली आहे.
चाैकट
गट मजबूत करण्यासाठी
खासदार संजयकाका पाटील यांनी आपला गट मजबूत करण्यासाठी तरुणांना संधी देण्यास पावले उचलली आहेत. भोसले व घाडगे यांच्या निवडींने खासदार गटाला आगामी काळात तरुणांचे संघटन करण्यास फायदा होणार आहे.