रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांत कठोर पावले उचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:05+5:302021-06-19T04:19:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास ...

Strict measures were taken in the villages with high number of patients | रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांत कठोर पावले उचला

रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या गावांत कठोर पावले उचला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत आणि नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गावभेटीमध्ये केले. यावेळी त्यांनी टेस्टिंग वाढविणे, विलगीकरण कक्ष सक्षम करण्याच्या सूचनाही केल्या.

मंत्री पाटील यांनी साखराळे, तांबवे, नेर्ले, पेठ, रेठरे धरण या गावांना भेटी देऊन तेथील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकारी व गावकऱ्यांना सूचनाही केल्या. आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, तालुका आरोग्यधिकारी डॉ. साकेत पाटील या दौऱ्यात सहभागी झाले होते.

ते म्हणाले, ज्या घरात वेगळी खोली, स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था आहे, तिथे विलगीकरण शक्य आहे. मात्र, ज्या घरात अशी व्यवस्था नसेल, त्या घरातील रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षातच यायला हवेत. ज्या कुटुंबात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्या कुटुंबातील, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट व्हायला हवी.

डॉ. चौधरी यांनी घराबाहेर फिरणारे कोरोनाबाधित रुग्ण, गर्दी करणारे, विनाकारण बाहेर फिरणाऱ्या, तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दररोज टेस्टिंग व्हायला हवे. प्रथम संख्या वाढलेली दिसेल. मात्र, त्या-त्या गावात कोरोना आटोक्यात येऊ शकतो.

यावेळी बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, संग्राम पाटील, संजय पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, ब्रह्मानंद पाटील, संगीता पाटील, संपतराव पाटील, श्यामराव पाटील उपस्थित होते.

Web Title: Strict measures were taken in the villages with high number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.