साळुंखे महाविद्यालयात छात्रसेना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:20+5:302021-02-15T04:24:20+5:30
छात्रसैनिकांना नकाशा वाचन, शस्त्र प्रशिक्षण, सैन्य इतिहास, एकता व अनुशासन, फिल्ड व बॅटल क्राफ्ट, व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ...
छात्रसैनिकांना नकाशा वाचन, शस्त्र प्रशिक्षण, सैन्य इतिहास, एकता व अनुशासन, फिल्ड व बॅटल क्राफ्ट, व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. १६ महाराष्ट्र बटालियन सांगलीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस. के. बाबू, लेफ्टनंट कर्नल एम. एस. कुलकर्णी, सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. लेफ्टनंट प्रा. दिगंबर नागर्थवार, लेफ्टनंट विठ्ठल रासकर, हवालदार शरद जाधव यांनी व्यवस्थापन केले. महाविद्यालयातील ७१ छात्रसेनिक शिबिरात सहभागी होते. यावेळी लेफ्टनंट रँक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष शेळके यांच्याहस्ते विठ्ठल रासकर यांचा सत्कार करण्यात आला. मानसी राजपूत हिने प्रास्ताविक केले. रेवती फडके, दिव्या गायकवाड, विजय माने यांनी मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री कदम हिने सूत्रसंचालन केले.