कामेरी : श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्यावतीने गुरुदेव कार्यकर्त्यांसाठी आॅनलाईन निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कामेरी (ता. वाळवा) येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालयातील शिक्षिका अनुराधा पेडणेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत संस्थेतील ३८ गुरुदेव कार्यकर्ते सहभागी झाले होते. पेडणेकर यांची राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना मुख्याध्यापक एस. बी. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत कामेरीच्या छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूलच्या उमेश मिणेकर यांच्या ‘कोरोनाचा शैक्षणिक क्षेत्रावरील परिणाम’ या विषयावरील निबंधाला जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळाला. या यशाबद्दल दोघांचेही अभिनंदन होत आहे.
फोटो - १२०२२०२१-आयएसएलएम- अनुराधा पेडणेकर
१२०२२०२१-आयएसएलएम-उमेश मिणेकर